लिहीत जातो कशास आपण?

ही कविता सुचण्याला कारण, मेघनाचा खो :) धन्यवाद मेघना

लिहीत जातो कशास आपण?
लढवत बसतो शब्दांचे रण

शब्द पाहावा शब्दच गावा
शब्दातच जिवलगही दिसावा

कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ

लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण

कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण

शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन

शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!

8 comments:

Meghana Bhuskute said...

:)

hemant_surat said...

लिहीत ज्जतो कशास आपण
रद्दीत जाते खुशाल सरपण

कधी न सुचले त्यांना धडपण
गद्द्यातही थांबलो उगाच आपण

शब्दं करिती किमया जादू
शब्दं आणिती आभास पाहू

अडले होते तेही शब्दंच
शब्दांपुढती ठरतो नि:शब्दच!

हेमंत_सूरत

HAREKRISHNAJI said...

आपल्या मनात आलेले विचार जो पर्यंत आपण कागदावर उतरवत नाही तो पर्यंत मनाला लागलेले ठुसठुस, आलेली बैचैनी

श्यामली said...

हेमंत, हरेकृश्णाजी कविता वाचून आवर्जून अभिप्राय लिहिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद :)

जयश्री said...

क्या बात है रे.......!!

मस्त लयबद्ध झालीये कविता......!!

शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन

शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!

एकदम जबरी.....!!

श्यामली said...

khup khup dhanyawad jayu :)

अभि said...

शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!
>>>

सुंदर!!! "काजळरात्री शब्द सहारा!!" अगदी अगदी श्यामली.. मस्त उतरल्यात सर्वच ओळी.. पण शेवटची ओळ वेड लाऊन गेलीय!!

Yashodhara said...

शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!

shyaamale, tulaa kaaya mhanasheel te bakshees ga!!