जायके का सफर

धडक..........धडक......... धडक ..........धडक करत धावणारी ट्रेन, मागे पडत जाणारी स्टेशनं आणि प्रत्येक एपिसोडमधे नवीनं गावात खाद्यंती. "जायके का सफर" पूर्वी कधीतरी हा कार्यक्रम लागायचा कोणत्यातरी वाहिनीवर .'जायका' हा शब्द उच्चारतानाच कसं तोंडात रेशमी कबाब किंवा तत्सम पदार्थ विरघळल्याचा भास होतो (बघा बरं म्हणून). तर मी लिहितीये ते या कार्यक्रमाबद्दल नाही होss माझ्या जायक्या च्या सफर बद्दल लिहायचंय मला.

खाद्यंतीची वेगवेगळी ठिकाणं अजमावणं आणि परत परत तिथे जाऊन खाणं असा ब-याच जणांचा छंद असतो.
अर्थात खायची आवड असणा-यांबद्दलच बोलता येईल हे. तर माझ्या खाद्यंती च्या शोधयात्रेतली काही आवडलेली न-आवडलेली ठिकाणं.
सुरवात अर्थात औरंगाबाद :-)
जसं आठवतंय त्याप्रमाणे पहिलं hotel Darling न्यू उस्मानपु-यात असलेलं शेट्टीचं अर्थात उडुपी, पुर्णपणे शाकाहारी रेस्टोरेंट. याच्याकडचा darling special मसाला डोसा जबरी असायचा. अजूनही हे hotel त्याच जागेवर चालू आहे एका hotel ची बरीच hotels झाली आहेत म्हणे आता. घाटी दवाखान्याचं(govt hospital)canteen तेही याचंच याच्याकडे मिळणारा वडासांबार आणि बटाटावडा ब-याच वर्षापासून खात आलो आम्ही .सध्याचं स्टेटस माहीत नाही याचं पण स्वस्त आणि चवदार असा लौकिक होता याचा तेव्हा.

औरंगाबादच अजूनही फ़ेमस असलेलं नावं म्हणजे मछ्ली खडकला असलेलं उत्तम मिठाई याच्याकडची इम्रती आणि फाफडा अतिशय प्रसिद्ध आहे .तिकडे गेलात कोणी तर नक्की खाऊन पाहाच. याच्या लाईनीत असलेलं अमृतभांडार फक्त दह्यासाठी प्रसिद्ध फक्त दह्याच्या जोरावर या माणसाचा धंदा अजूनही टिकून आहे.याच्या समोरच अजून एक दुकान मिठायांसाठी प्रसिद्ध मिलन मिठाई हे अलीकडे जास्ती पुढे आलंय . विश्वासाने सगळे पदार्थ आणु शकतो याच्याकडुन.

क्रमश:

2 comments:

Mints! said...

jaayakekaa safar surabhi chaach ek bhaa part hota.

changale chaalaley .. chaaludyaa :)

श्यामली said...

सुरभीचा नाही ग हे सोनी टीव्ही वर लागायच बहुतेक

आणि सुरभीच्या बरच नंतर अस आठवतय मला.

असो तू येउन वाचलस त्याबद्दल धन्यवाद :)