जराशी धडपड

दोस्तहो नमस्कार,
तीन्-चार महीन्यापूर्वी जयाची कविता वाचता वाचता चाल सुचली मला,आणि ती record करुन ऐकवली तुमच्यापैकीच काही मंडळींना.
चाल उत्तम असल्याचे अभिप्राय आले, बरच प्रोत्साहन मिळालं म्हणुन studio मधे जाउन recording करायची हिम्मत केली.

नवर्‍यानीही कौतुकानी या गोष्टीत भाग घेतला, support केला. :-)
आवाजाला रियाजाचा अभाव लगेचच जाणवतोय त्या बद्दल कान उघाडणिही झालीये :-)
तरीही माझं हे गाणं, जसं आहे तसं तुम्हा सर्वांना ऐकवावसं वाटतयं.
तर हे माझं पहिलं वहिलं गाणं माझ्या तमाम दोस्त मंडळींना सादर अर्पण


http://odeo.com/channel/411313/view

चारोळी

मनाच्या मनाला
कशा व्यथा कळाव्या
न ओठी शब्द येता
नेत्री तूझ्या दिसाव्या