बघता बघता मी लिहिलेल्या गीतांचा अल्बम प्रकाशित होऊन पाच वर्ष झाली. माझ्या एका गाण्याला हरिहरन यांचा आवाज लाभणार आहे अस बोलता बोलता बोलून गेले होते. हे ऐकल्यावर या ब्लॉगमुळेच ओळख झालेले पत्रकार मित्र महेश देशमुख यांनी अल्बम बद्दल सविस्तर माहिती विचारून घेतली आणि फोटो देखील पाठवायला सांगितला. आजच्या दिवशी २०१२ मध्ये हा ही फोटोसहीत एवढी मोठी बातमी दैनिक दिव्य मराठी मध्ये छापून आली होती.
Showing posts with label चांदणशेला. Show all posts
Showing posts with label चांदणशेला. Show all posts
जरा स्पंदनांना सांभाळ राणी
स्वर:- जयदीप बगवाडकर
जरा स्पंदनांना सांभाळ राणी
ऐकेल कोणी अपुली कहाणी
इथे मी तिथे तू तरी भास होतो
कसा जीव वेडा तुझ्यापास रमतो
शहारुन फुलते पहा रातराणी
कशाची नशा ही सुगंधी सुगंधी
नाहीस जवळी तरी गूज कानी
सजे रात्र ऐसी तुझ्या आठवांनी
किती दूर झालो तरी ना विसरलो
चंद्रासवे मी तिथे रोज येतो
स्पर्शून घेतो तुला चांदण्यांनी
http://gaana.com/song/chandanshela/jara-spandanana-sambhala-rani-1220228
जरा स्पंदनांना सांभाळ राणी
ऐकेल कोणी अपुली कहाणी
इथे मी तिथे तू तरी भास होतो
कसा जीव वेडा तुझ्यापास रमतो
शहारुन फुलते पहा रातराणी
कशाची नशा ही सुगंधी सुगंधी
नाहीस जवळी तरी गूज कानी
सजे रात्र ऐसी तुझ्या आठवांनी
किती दूर झालो तरी ना विसरलो
चंद्रासवे मी तिथे रोज येतो
स्पर्शून घेतो तुला चांदण्यांनी
http://gaana.com/song/chandanshela/jara-spandanana-sambhala-rani-1220228
चांदणशेला
![]() |
| कॅप्शन जोडा |
या अल्बमला संगीत शशांक पोवार यांच आहे तर स्वरसाज चढवला आहे हरिहरन, वैशाली सामंत, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, पं.रघुनंदन पणशीकर,जसराज जोशी आणि जयदीप बगवाडकर यांनी
चांदणशेला फेसबुक पेजलिंक https://www.facebook.com/chandanshela/
दिन आज भटकत राही
दिन आज भटकत राही का उगाच
स्मरते काही?....
सांग ना....सांग ना
एकाच पावसाची का फिरून
याद येई?
सांग ना...सांग ना
स्पंद माझा थबकतो रे ऐक
सखया तुजविना
ऐक ना...ऐक ना
मी तुझ्यात हरवत असता; मज तिथेच
भेटे कविता
रुणझुणतो श्रावण माझा
चाहूल तुझी रे मिळता
गूज सारे आज वा-या पैल
जाऊन सांग ना...सांग ना
क्षणी दाटे उरी हुरहूर; क्षणी
नाचू लागती मोर
हे नवीन काही घडते या
नभास बहुदा कळते
दो दिशातील अंतरांना सांधणारा
बंध हा, ऐक ना...ऐक ना
संध्येच्या पारावरती
संध्येच्या पारावरती विस्कटले ऊन्ह जरासे
मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे
संध्येच्या पारावरती कल्लोळ अस्वस्थांचा...
काळोख दाटुनी येतो उजळल्या गत जन्मांचा
संध्येच्या पारावरती प्रश्नांची बैठक भरली
न्यायनिवाड्याआधी शिक्षेची सुटका झाली
संध्येच्या पारावरती चुकलेले हंबर कानी
मन शांतपणाचे त्याला घालतसे चारापाणी
संध्येच्या पारावरती प्राणाची धडपड नुसती
हा देह सुटेना अजुनी; नि:स्तेज तेवते ज्योती
देहावर मोहरली रिमझिम सावरिया
देहावर मोहरली रिमझिम सावरिया
अधरावर गुणगुणली थरथर सावरिया
लगबग बघ न्यासांची
तगमग या श्वासांची
स्पर्श स्पर्श छेडती; राधा सावरिया
न्यासांना, श्वासांना साज दे सावरिया...
साज दे सावरिया
खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया
मन रुमझुम रुमझुम गाते
चांदणशेला या माझ्या अल्बममधलं हे गीत बेला शेंडे च्या आवाजात.
हे गीत ऐकण्यासाठी या पोस्टच्या शिर्षकावर क्लिक करा
हे गीत ऐकण्यासाठी या पोस्टच्या शिर्षकावर क्लिक करा
मन रुमझुम रुमझुम गाते
फुले हळवे हळवे नाते
गंध नवा हवा हवासा
आला घेऊन खट्याळ वारा
काय सांगतो शब्द ऐक
स्पर्श लेऊन आली हाक
अशा खुळ्या चाहुलिंचा
देही उठतो शहारा
स्वप्न असावे कुणी म्हणे
भास असावे कोणा ठावे?
कसा चंद्रही नवतीचा
उगाच देई पहारा
तुझ्या इच्छेविना देवा माझे बापुडे साहस!
| Hariharan ji and me while recording my song |
येस्...तीच मेल होती, अमुक तारखेला, दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या स्वतःच्या(च) स्टुडिओमधे रेकॉर्डिंग असेल. अग्ग्ग्ग्ग्ग बाब्बो! जागी आहे का मी नक्की? नक्की हे वाचतेय का?
समोर दिसत असुनही मला हे अजिबात खरं वाटेना, लगोलग पुन्हा लताजींना* फोन लावला, की तुमची मेल आली आहे, त्यांच उत्तर हां जी, दो दिन पहेलेही मैने मेल भेजा था आपको. (च्यामारी त्या ३१डिसेंबरच्या सिलेब्रेशनची) मी दोन दिवस ऑफलाईन असल्याचा माझा मलाच राग आला.
त्यानंतर पुन्हा सगळं पहिल्यापासून पुन्हा, पुन्हा वाट बघणं, पुन्हा आशा-निराशा, होतय का नाही ? उलघाल नुसती. सलग तीन्-चार दिवस लताजींना फोनवर पिडणं, त्यांनी रोज, आपकी डेट मेल कर दुंगी इतनी फिकर मत किजीये, म्हणून सांगण्...हुह!
तर झालं असं की मी लिहिलेल्या गीतांच्या अल्बमच काम चालू आहे, एक गाण असं जमून आलं की ते ऐकताना स्टुडिओत असणारी मंडळी "अरे क्या बात है! इसके लिये तो कोई उस्तादही चाहिये... "
काहीतरी नवीन, काहीतरी नवीन म्हणत मी भलत्याच तिढ्यात अडकले होते. या गाण्यासाठी सुचवलेली नावं ऐकून झोप उडाली होती. शेवटी धीर करुन शशांकशी बोलले, त्यानी फोन नंबर्स दिले आणि हा वरचा प्रवास सुरु झाला.
काल साधारण सकाळी साडे-दहाच्या सुमारास आम्ही चांदिवलीत असणा-या त्यांच्या स्टुडिओत पोचलो. धाकधुक-धडधड्-पोटात गोळा, सगळं जे काय होत असत ते सगळं एकाच वेळेला होत असल्यावर काय होत असेल माणसाच? मेले नाही एवढच खरं
स्टुडिओत बसून काही कप चहा पोटात ढकल्यावर जरा नॉर्मलला आले बहुतेक. शशांकनी* ट्रॅक सेट केला, दोन्-तीन वेळा आम्ही ट्रॅक पुन्हा ऐकला. शब्दांवरुन नजर फिरवली, सर कधीही येतील असं तिथल्या साऊंड इंजिनिअरनी सांगितल्यामुळे नजर दरवाज्याकडेच आणि उगाच मग रिकाम्या स्टुडिओचे फोटो काढ, इकडे बघ तिकडे बघ, सायलेंट वर टाकलेलां फोन ५० वेळा उचलून बघ, मेसेज करुच का सगळ्यांना? अरे मला हे सगळं लवकरात लवकर सांगायच आहे...काढून झालेले फोटो पुन्हा पुन्हा बघून झाले....आणि आहा....दरवाजाच्या काचेतुन हरिहरन येताना दिसले. अगदी तुमच्या माझ्यासारखा साधा पोषाख निळी जिन्स त्यावर साधासा शर्ट, एखाद्या तपस्व्या सारखे लांब केस चेह-यावर असणरे शांत भाव...आम्ही दोघ ताडकन उभे राहिलो..आपोआप घडणारी गोष्ट, आवर्जून काही करावच लागल नाही एकामागे एक दोघही जण त्याच्यापुढे वाकलो, अरे ऐसा मत करो रे...
हं! चला ट्रॅक सेट केला का तुम्ही? शब्द सांगता का मला; मी लिहून घेतो.....अग्ग ग्ग! अरे किती वेळा मरु? मी हळूच पर्समधला गाण्याच्या प्रिंट्-आउटचा कागद काढून त्यांच्यापुढे धरला. गडी खुश...अरे वा! तुम्ही तर तयारीत आहात एकदम! चला ट्रॅक ऐकू या एकदा...
साहेब रेकॉर्डिंग रुममधे पोचलेसुद्धा होते...शशांक तुला मी कसं गायला हवं आहे? जसंच्या तसं देऊ का? का मी काही अॅडिशन केल्या तर तुला चालणार आहेत? शशांक गार... एवढा मोठा गायक, आणि एवढी लीनता? उगाच मोठे होत नाहीत लोकं खरंच त्यासाठी अंगभूत मोठेपणा असावाच लागतो.
गाणं सुरु करायच्या आधी त्यांनी आवर्जून सांगितलेली गोष्ट इथे सांगायला आवडेल, अरे तू मेल मधे पाठवलेला ट्रॅक मी प्ले केला तर मला वाटल तुम्ही लोकांनी चुकीचाच* ट्रॅक पाठवला मला बहुतेक
आमच्याशी बोलताना मुद्दाम मराठीत बोलत होते, त्यांच्या माणसांशी मल्याळममधे बोलत होते, मधेच कोणाचा फोन आला तर उर्दू
डबिंग सुरु झालं, मुखडा फायनल झाला, गाण पुढे सरकलं, गाता गाता मधेच एके ठिकाणी, शशांकला "अरे काय गोड केलंयस रे हे!" ही अशी उत्स्फूर्त आलेली दाद पण... ऑ!!!!! गोड??? तुमच्या आमच्यासारखं मराठी...कधी शिकत असतील हे असं सगळ?
गाण्यातली एक ओळ, हाय कैसी ही कळा? अशी आहे, आणि कैसी च्या कै चा उच्चार उर्दूकडे जात होता, मी उठून शशांकपाशी आले ते सांगायला तर हे गायचे थांबले आणि विचारलं, ठीक चालल्य ना सगळ? मी चाचरत म्हणाले सर ते कै चा उच्चार जरा....." अरे यार, हां मै उर्दू मे घुस रहा हु" "चलो टेक फॉर कैसी"
क्रॉसलाईनला सारंगी आहे ट्रॅकमधे आणि तिथे आलाप घ्यायचा होता, त्यांनी आलाप घ्यायला सुरवात केली, एक आलाप एवढा कातील दिला त्यांनी की शशांक पुटपुटलाच ,सारंगी गेली..., स्पिकरमधुन लगेच आवाज, हा आलाप नको थांब; मी दुसरं देतो काहीतरी....त्या सारंगीची ब्युटी आहे या इथे; ती नको जायला (अहो मनकवडे की काय तुम्ही?)
अवघ्या दिड तासात गाण्याच डबिंग संपल. गाणं पूर्ण होऊन आमच्या हातात. झालं ना तुम्हाला हवं तसं, म्हणत माणूस इतर कामांकडे वळला, काही बदल करायचा असेल तर सांगा मी आहे इथे, करता येईल.
अजून किती तरी आहे सांगण्यासारखं...पण आता थांबतेच
गेल्या ६-७ वर्षापासून आयुष्यात काही घडलं की लहान मुलासारखं मायबोलीवर येऊन सांगायची सवय लागली आहे. अजून अल्बमच रिलीज वगैरे फॉर्मेलिटिज बाकी आहेत. पण ही आयुष्यातली खूप मोठी गोष्ट इथे सांगितल्याशिवाय राहवेना.
*लताजी: हरिहरनच्या मॅनेजर
*शशांक पोवारः अल्बमचे संगीतकार
*या गाण्याचा सरप्राईज एलिमेंट
वरच्या फोटोत हरिहरन साहेबांना सगळ्यांनी ओळखल असेल, कदाचित मलाही ओळखल असेल
का पुन्हा पुन्हा हा जीव इथे घुटमळतो?
जणू प्राणच माझा शब्दातुन दरवळतो
या शब्दांचे हे अजब लाघवी नाते..
हातास धरूनी; मज समेस घेऊन येते
~श्यामली
लेबले:
चांदणशेला
undefined
Chandivali, Mumbai, Maharashtra, India
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?
अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
अशी हाय कोठून येते उदासी?
अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
चांदणशेला
ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला
ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला
ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने अन आणा-भाका.. नाजुकसा रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. गुणगुणला चांदणशेला
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला
ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला
ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने अन आणा-भाका.. नाजुकसा रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. गुणगुणला चांदणशेला
Subscribe to:
Posts (Atom)



