रंगायची नेहमीच तशीच आजही रंगलेली मैफल, तू समेवर येताना तुझ्या सुरात सुर मिसळत, तानपु-याची साथ करणारी मी देहभान विसरुन गाण्यामधे हरवलेला तू . . . मी हळूच उतरवला तानपुरा मैफल रंगलेली...
मी विचारलं, परत कधी भेटणार तू, आणि तुझ्या कविता ऐकवत सुटलास एकानंतर एक मीही शोधत राहिले, त्यातच मला हवी असलेली एक तू बोलत होतास मी ऐकत होते ठरवलं होतं, कशी आहेस? विचारलंस की, ऐकवेन मीही, माझी नसलेली, तुझीच एक कविता तू विचारलही "कशी आहेस?" मी नुसतीच हुंकारले होते... (छानच होती... कविता!!!)