आजचं नुकसान

ब्लॉगला थोडं ठीकठाक करायच्या नादात फॉलवर्स गॅजेट गमावावं लागलं :(
ते कसं परत मिळवता येईल? कोणी सांगेल का हे परत कसं मिळवायच? मी सेटींग मध्ये जाऊन फॉलोवर्स गॅजेट अ‍ॅड करायला गेले तर त्याच्यावर अ‍ॅड असं साईन येतच नाहिये.

4 comments:

हेरंब said...

ब्लॉगची डागडुजी करण्याआधी ब्लॉग टेम्प्लेटचा बॅकअप घेतला होता का? घेतला असेल तर तो आधी रिस्टोर करावा लागेल. त्यातून फोलोअर विजेट कोड कॉपी करून पुन्हा नवीन टेम्प्लेट टाकून नवीन ठिकाणी तेच कोड टाकावं लागेल बहुतेक.

श्यामली said...

backup navhataa na ghetalaa :(

shardul said...

आज पहिल्यांदाच वाचतोय तुमचा ब्लॉग.
फॉलोवर्सचं गॅजेट गेलं तरी काळजी नको.

१. ब्लॉगरच्या डॅशबोर्डवर जावं लागेल.
२. तिथून या ब्लॉगजवळच्या 'Layout' लिंकमधून आत.
३. तिथे दिसेल 'ऍड गॅजेट' ची लिंक.
४. त्यात (सद्ध्या) वरून दुसरं बटन.
५. नवीन गॅजेट सगळ्यात वर जमा होतं. ते ड्रॅग करून पाहिजे त्या ठिकाणी ठेवा.
आणि झालं ! :)
सोपं आहे.

श्यामली said...

धन्यवाद शार्दुल.. पण हे सगळ माझं करुन झालंय आधीच. 'ऍड गॅजेट' च्या फॉलोवर्स च्या लिंकच्या बाजुचं + बटन गायब आहे खालचा मेसेज दिसतोय.

अनुयायी
प्रायोगिक

आपल्या ब्लॉगचे अनुसरण करणार्‍यांची यादी प्रदर्शित करते.

हे गॅझेट प्रायोगिक आहे आणि अद्याप सर्व ब्लॉग्जवर उपलब्ध नाही. लवकरच परत तपासा!