पारिजाता (October)
अवघ्या काही तासांचं आयुष्य असलेल्या पारिजातकाच्या फुलाबद्दल कोणी काही बोललं तरी ती कविता वाटावी एवढं आकर्षण आहे या पारिजातकाच्या फुलाचं .
एवढं सुंदर, नाजूक, काहीच वेळेत कोमेजून प्रवास संपवणारं.
ऑक्टॉबर या चित्रपटाच्या लेटरिंगमध्ये स्पेलिंगमध्ये असलेल्या O या अक्षरात नाजुक पारिजातकाचं फूल दाखवलं आहे .
तर हे पारिजातकाचं फुल सुरवातीलाच बोट धरतं तुमचं आणि गोष्ट सांगू लागतं शिवली आणि डॅनची.
लौकिक अर्थानं ही मुळीच प्रेमकथा नाही पण एका घटनेमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या डॅनला कसा मिळतो? स्वतःला शोधण्याचा त्याचा प्रवास कसा होतो ?
डॅन अगदी सर्वसामान्य असणारा एक मॅनेजमेंट ट्रेनी जो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इंटर्नशिपसाठी काम करतो आहे . याला रोज देण्यात येणारं कुठलंच काम आवडत नाही तो एकही काम धड करू शकत नाही . आणि त्यामुळे त्याची रोज वेगळ्याच डिपार्टमेंटला बदली होते .
प्रत्येक काम करताना त्याचा कामचुकारपणा , बावळटपणा सहज दिसून येतो. महत्वाकांक्षा आहे पण त्यासाठी जे कष्ट करायला हवेत त्याची काही गरज नाही किंवा ते करणं हा निव्वळ मूर्खपणा आणि वेळ घालवणं आहे असा याचा ठाम समज .
या उलट शिवलीचं पात्र उभं केलं आहे, संवाद असे फार नाहीतच या मुलीला. शांतपणे तिला दिलेली कामं ती करत राहते . अगदी छोट्या सिनमध्ये कोणाच्याही नकळत याला मदत होईल असं काम करून टाकते. डॅनचा वेध घेणारी एखाद दुसरी चोरटी नजर हाच काय तो रोमान्स.
हॉटेलमध्ये टेरेसवर हे लोक पार्टी करत असतात आणि कठड्यावर असलेल्या दवामुळे शिवलीचा हात घसरतो आणि ती टेरेसवरून खाली पडते .
तिला दवाखान्यातनं बघून आल्यावर डॅनला समजतं की पडायाच्या आधी शिवली, डॅन कुठंय ? विचारते आणि इथे डॅनच्या प्रवासाला सुरवात होते .
जगतेय का मरतेय अशा अवस्थेत असणाऱ्या शिवलीसाठी डॅनचं बदलणं. त्याच्या मित्रांचं त्याला सपोर्ट करण. शिवली, शिवलीची आई, बहीण, भाऊ, आपण निर्णय घ्यायला हवा आता, असं सारखं सारखं म्हणणारा शिवलीचा काका. व्हेंटीलेटरच्या स्विचपासून काकाला लांब ठेव असं डॅन जिला बजावून सांगतो ती नर्स . अगदी सगळी पात्र सुस्थळी .
लेखक आणि दिग्दर्शकानी एक सुंदर कविता उभी केली आहे .
फक्त तीन तास टाईमपास हवा असेल तर मुळीच बघू नका

No comments:
Post a Comment