जवळजवळ सात वर्षांनंतर आम्हा चौघांना एकत्र ट्रिपला जायची संधी
मिळाली होती. जायच कुठे यावर कॉन्कॉल ( बेळ्गाव, पुणे, मुंबई आणि दुबई )
घेऊन खूप खलबतं, झाली निव्वळ टुरिस्ट डेस्टिनेशन असलेला देश बघायला जायच
आम्हाला कोणालाच मान्य नव्हत. त्यामुळे कुठे जायच हे ठरवण्यासाठी आमचा
बराच रिसर्च झाला. इजिप्त, जॉर्जिया, अझरबैजान , मलेशिया असं करत करत
शेवटी अर्मेनियावर शिक्कामोर्तब केलं गेलं . दोन्ही मुलं म्हणजे कौशल
देविका आणि नवरा यांच जोरदार प्लॅनिंग चालल होत. ( मी जरा या सगळ्या
प्लॅनिंगकडे तटस्थतेनी बघत होते. )
शारजाह ते येरेवान १२ फेब्रुवारीच्या फ्लाईटची चौघांची तिकीटं पण बुक केली गेली. त्याच्या कित्येक दिवस आधी माझं पुणे ते दुबई १० जानेवारीच तिकीट बुक झालेलं होतं. पुण्यातली कामं संपवण, घरातली झाकापाकी करण, किल्या जिकडल्या तिकडे ठेवण. येण्याआधी काही गोश्टिंची शॉपिंग करायची असते ती शॉपिंग करण .माझी बॅग भरण. माझं सामान जास्ती होणार होतं म्हणून अर्मेनियाला जायचे कपडे दुस-या एका बॅगमधे भरुन ती बॅग "प्लिज पिक मी" असा टॅग लावून देविकाच्या खोलीत ठेवण. भाऊ आणि बाबांना एकदा सोडून ब-याचवेळा फोन करण कामवालीला आटह्वड्यातन एकदा येऊन काय काय करायच त्या सूचना देणं असं सगळ सगळ अगदी पुर्ण श्रद्धेनी करुन झालं होतं. आणि माझ्या दुबईला यायच्या आदल्या दिवशी मला समजत की एक सरकारी काम जे काही दिवसांपासून अडकलेल होतं ते या काही दिवसात होणार आहे. काम होणार म्हणून हुश्श!! म्हणाव का केलेला प्लॅन फेल जाऊ नये याची काळजी करु ते कळेचना मला.
तर त्यानंतर वेळेवर माझं सरकारी काम झालं मला लगेच पुढच्या आठ दिवसानंतरच तिकीट मिळाल आणि अर्मेनिया ट्रीपला जायच्या पंधरा दिवस का होईना आधी दुबईत दाखल झाले.
"बर्फ असण्याचे दिवस आहेत आपण जातोय ते तेंव्हा थर्मल्स नक्की घ्या." मुलांनी आई-बाबांना आवर्जुन कळवलं होतं. बाबा, कॅनडा, जर्मनीला येता जाता असल्यामुळे बाबाकडे थर्मल्स होतेच. प्रश्न आईचा होता. आईनी दुबईत येऊन पुन्हा शॉपिंग केलं.
थर्मल्स, लोकरीच्या टोप्या, ग्लोव्हज, लोकरीचे सॉक्स, लेदर जॅकेट्स हुह!! खूप मोठी लिस्ट.
भारतीय पासपोर्ट असणा-यांना ऑन अरायवल व्हिसा देणारे देश https://www.bankbazaar.com/visa/list-of-visa-free-countries-for-india.html यामधे अर्मेनिया आहे.
आजपर्यंत रेसिंडेन्स व्हिसावर वावरणारी मी, मला जराशी या व्हिसा प्रकरणाची भितीच वाटते. त्यात मुलांचा दुबईचा रेसिडेंस व्हिसा कॅन्सल केलेला. त्यांचा प्रवास व्हाया शारजाह होणार होता. मी एकदा सोडून जवळ जवळ २० -२५ वेळा एअर अरेबियाला फोन करुन खातरी करुन घेतली होती की मुलांना मुंबईला बोर्ड करताना काही अडचण येणार नाही. मुलांनी देखील त्यांचा त्यांचा रिसर्च केला होताच पण ...
आता पुन्हा एअर अरेबियाला फोन करुन पुन्हा खातरी करुन घेतली की येरेवानला पोचल्यावर व्हिसा प्रोसेस होतो. इथुन काहीही करायची गरज नाही.
फ्लाईट शारजाहवरुन सकाळी आठ वाजता होती. मुले रात्रीच्या फ्लाईटनी शारजाहला निघाली होती त्यामुळे झोपेची मज्जाच होती. त्यात पोटानी त्रास द्यायला सुरुवात केली. म्हटल झालं आता ट्रिपमधे पोट त्रास देणार. बरोब्बर २० डिसेंबरपासून स्टमक इन्फेक्शन, अमुक ढमुक तमुक करत पोटाची वा ट लागली होती. तिखटामधला ति सुद्धा पोटाला चालत नह्वत. नुसत्या खिचडी आणि मऊ भातावर एक दिड महिना काढला होता. दुबईला आल्यापासून घरचच सगळ खायला लागले होते. त्यामुळे पोटाच्या हाका ऐकून घाबरले होते.
रात्रभर जागरण करुन पहाटे साडेचारला शारजाह एअरपोर्टला पोचलो. रेसिडेंस व्हिसा होता बोर्डिंग लगेच मिळायला हवा खर तर पण किती तरी वेळ बोर्डिंग काउंटरवाला आम्हाला बोर्डिंग पास देईचना. येरेवान मधलं हॉटेल बुकिंग कन्फर्मेशन बघुन झालं होतं . मग त्याच्या सिनिअरला बोलवल दोघांची काय खलबतं झाली कळल नाही. पण बोर्डिंग पास तयार झाला. लगेज बेल्टवर टाकल. मी म्हटल विचार तरी का एवढा वेळ लागला ते. मग विचाराल्यावर अस समजल की नव-याचा पासपोर्ट संपत आला आहे सहा(च) महिने राहिले आहेत.
शारजहा एअरपोर्टला आमच येणं होत नाही त्यामुळे स्मार्ट गेटसाठी पासपोर्ट रजिस्टर करण ही एक अॅडिशन प्रोसेस माझा पासपोर्ट
नव-याचा पासपोर्ट एकाच बाईला दिला होता रजिस्टर करायला पण इमेग्रेशन गेट पास करताना फक्त मलाच जाता आलं नव-याला इमिग्रेशन क्युमधे उभ रहा म्हणून सांगण्यात आलं, म्हटल आता काय नविन काढतात? पण मग काही प्रॉब्लेम आला नाही. फक्त त्याचा पासपोर्ट स्मार्ट गेटसाठी रजिस्टर नव्हता झाला एवढच. हुश्श!!
एवढ सगळ उरकेपर्यंत साडेसहा वाजून गेले होते. अजून एका तासात मुलांची फ्लाईट येणार होती. आणि लगेच म्हणजे आठ वाजता आमचे येरेवानची फ्लाईट होती. खाण्यासाठी शारजाह एअरपोर्टवर फार काही खास ऑप्शन नव्हतेच, नवरा कानडी अप्पा असल्यामुळे त्याला दोसा चालणार होता. माझ्या पोटाच्या भितीमुळे मी इडलीच खाल्ली. मुलांसाठी पण टेक-अवे घेतलं
शारजाह एअरपोर्ट अतिशय लहान एअरपोर्ट आहे आणि त्या मानाने इथे खुप जास्त फ्लाईटस ये जा करतात त्यामुळे विमानतळ आपल्याकडच्या खूप गर्दी असलेल्या एखाद्या रेल्वेस्टेशनसारखं वाटत मला. जागा मिळेल तिथे लोक उभे असतात बसलेले अस्तात, किंवा झोपलेले असतात, स्वछतागृहांची अवस्थाही तीच असते. नावडत्या यादीत शारजाह एअरपोर्ट.
आमची फ्लाईट अनाउन्स झाली पण मुले अजून बाहेर आली नव्हती. आम्ही एकदा बोर्डिंग गेटकडे एकदा मुलांच्या अरायवल गेटकडे अशा चकरा मारत होतो. मुले आली आणि आम्ही सगळे येरेवानला जाणा-या विमानात बसलो.
मला आणि कौशलला खिडकीच हवी असते. देविकाला आणि बाबाला झोपायच असत त्यामुळे मला आणि कौशलला आरामात खिडकी मिळाली फक्त खिडकीतुन बाहेर बघताना जी बडबड असते ती ऐकायला सोबत कोणी नव्हत कारण आमच्या सिट्स लांब लांब आल्या होत्या.
मी दुबईला आल्यापासून पावसाळी हवा होती आम्ही निघायच्या दिवशीसुद्धा पाऊस असणार होता. विमान उडल्यावर आजुबाजुला दिसणारे मोठे मोठे काळे-करडे ढग बघून लहान मुलासारखी मज्जा येत होती मला. विमान आता जरा जास्त उंचिवर गेल्याची जाणीव व्हायला लागली. दुरवर पसरलेलं वाळवंट संपुन मोठे मोठे डोंगर दिसायला लागले होते. एकदोन वेळा ओमान ला रोड ट्रिप झाल्यामुळे हे असे डोंगर ओळखीचे होते. इराणचा डोंगराळ भाग असा दिसतो हे वाचलेल ऐकलेल होतं पण नक्की खाली इराण आहे की आणि दुसरा देश हे तेंव्हाच्या तेंव्हा समजू शकणार नव्हत. काही वेळ हे डोगर राहिले बघता बघता जरा डुलकी लागली. जाग आल्यावर बाहेर बघीतल तर दृष्य तेच होतं पण जरा लांब एक डोंगर पांढ-या डोक्याचा दिसला म्हटल, अग्बाई म्हातारा झाला वाटत तो डोंगर! असं म्हणते तोवर अजून लांबचे डोंगर पांढर डोकं दाखवायला सरसावले. अजून पुढे गेल्यावर लांबवर पसरलेलं पांढर पठार दिसायला लागलं.
मी जवळ जवळ ओरडून देविकाला उठवलं होतं ,एवढा!!!!! बर्फ!!!!!