कधी जमणार?

चालताना तारेवर
तोल राखणं
डावीऊजवीकडे न झुकता
सरळ चालणं
कधी जमणार.....?

वाहताना कवीतेतुन
शब्द सांभाळणं
आणि व्यक्त होताना
अव्यक्त राहाणं
कधी जमणार.....?

जगताना आयुष्य
अपेक्षा ठेवणं
आणि उपेक्षा झाली की
निरपेक्ष दाखवणं
कधी जमणार......?

श्यामली!!!

3 comments:

Vibha said...

Khupch chhan..

सुरेश शिरोडकर - Suresh Shirodkar said...

कवीता छान आहे .

श्यामली said...

विभा, सुरेश कविता वाचून आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद :)