अपेक्षाभंग.....कुणाचाही

ए.टी.एम मधून पैसे काढायला जाते तिथेच बाजुला भली मोठी मशीद आहे. तिथे मशीदिच्या बाहेरच्या पाय-यांवर एक बुरखा घातलेली बाई समोर एक डब्बा घेऊन बसलेली असते. मी आधी कधीच तीच्या डब्यात पैसे घातले नाहीत पण ४-५ महिन्यापूर्वी काय वाटलं कोणास ठाऊक मी थोडे फिल्स तिच्या डब्यात टाकले आणि मग ती सवयच झाली पैसे काढायला गेले की तीच्या डब्यात काही नाणी टाकूनच गाडीत बसायचं.

पण काल तिथे गेले पैसेही काढले आणि सुट्टे नव्हते म्हणून नाही टाकले तीच्या डब्यात पैसे. मी तिथून पुढे सरकत होते तेंव्हा तिने नेहमीच्याच अपेक्षेनं सलाम म्हणून डबा वरती उचलून धरला. माझा हात हालला पण मी नुसताच सलाम म्हणाले आणि पुढे जाऊन गाडीत बसले.

थोडासा रागच आला मला, की काय हे? एकदा दिलं म्हणून काय नेहमिच द्यायला हवं का? आणि नंतर मात्र उगाचच रुखरुख लागून राहिली मनाला. पहिल्याच दिवशी नसते दिले तिला पैसे तर तीचा हा अपेक्षाभंग टाळता आला असता मला.

5 comments:

Anonymous said...

Fils manaje....Kuwait..right naa...Manaje tumhi kuwait madhe rahataa....!!

pan mala kadhi kuwait madhe kadhi kuni bhikari disale nahi..!!!

Kamini Phadnis Kembhavi said...

नाही कुवेत नाही बाहरीनमधे असते मी.

Meghana Bhuskute said...

लिही ना तूपण. खो देण्याची वाट कशाला पाहायची? आणि वाटच पाहत असलीस, तर हा घे!

http://meghanabhuskute.blogspot.com/2008/03/blog-post_13.html

HAREKRISHNAJI said...

सवय वाईट. त्या मुळे मग हा अपेक्षाभंग होतो

Kamini Phadnis Kembhavi said...

तेच खरंय