ही कविता सुचण्याला कारण, मेघनाचा खो :) धन्यवाद मेघना
लिहीत जातो कशास आपण?
लढवत बसतो शब्दांचे रण
शब्द पाहावा शब्दच गावा
शब्दातच जिवलगही दिसावा
कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ
लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण
कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण
शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन
शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!
7 comments:
:)
आपल्या मनात आलेले विचार जो पर्यंत आपण कागदावर उतरवत नाही तो पर्यंत मनाला लागलेले ठुसठुस, आलेली बैचैनी
हेमंत, हरेकृश्णाजी कविता वाचून आवर्जून अभिप्राय लिहिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद :)
क्या बात है रे.......!!
मस्त लयबद्ध झालीये कविता......!!
शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन
शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!
एकदम जबरी.....!!
khup khup dhanyawad jayu :)
शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!
>>>
सुंदर!!! "काजळरात्री शब्द सहारा!!" अगदी अगदी श्यामली.. मस्त उतरल्यात सर्वच ओळी.. पण शेवटची ओळ वेड लाऊन गेलीय!!
शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!
shyaamale, tulaa kaaya mhanasheel te bakshees ga!!
Post a Comment