हे तेवढे बरे झाले

हे तेवढे बरे झाले
शाप सारे खरे झाले

चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले

दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले

खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?

मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले

5 comments:

Maahesh Deshmukh said...

wa sunder

Vijay Deshmukh said...

vvaa.....

Kamini Phadnis Kembhavi said...

dhanyawad deshmukha's :)

Vandana said...

छान! मला त्यातली भावना खुप आवडली, असच लिहीत रहा...

Kamini Phadnis Kembhavi said...

Thanks Vandana :-)