त्याला पुजत असताना
डोळ्यांपुढे असणारी मुर्ती बऱ्याचदा तुझी असते,
कधी कधी तुझ्या आणि त्याच्यातल्या साम्याच आश्चर्य वाटत;
तो कायमच कृपाळू कनवाळू वगैरे;
वाटत तुही तसाच;
तसा फारसा फरक नाहीच दोघांमध्ये
पण कधी कधी मात्र जाणवत
त्याला शेंदूर लावल्याची जाण म्हणून येत असेल हाकेला धाऊन.
तूला मात्र हे असलं काही करायची गरज भासत नाही
तू तसाच असतोस
शेंदूर लावण्याच्या आधीच्या त्याच्यासारखा...
7 comments:
surekh
dhanyavaad harekrishnaji :)
baryach divasani aalat, kase aahat?
छान आहे ...! शेवटची ओळ वाचून उगीचच हसू आलं.
धन्यवाद संग्राम :)
ह्म्म हसु आलं! :) कविता पोचली
ekdam mast .... "tu" mhanaje nemak kon.. he adhur thevun maja aanakhinach vaadhali
dhanywad vijay :) ho teech tar majjaa
Post a Comment