जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी

न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?

उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी

5 comments:

HAREKRISHNAJI said...

surekh

Kamini Phadnis Kembhavi said...

मन:पूर्वक धन्यवाद हरेकृ्ष्णाजी.

HAREKRISHNAJI said...

लागी रे ये कैसी अनबुझ आग
मितवा, मितवा, मितवा नही आये
व्याकुल जीयारा व्याकुल नैना

ओहित म्हणे said...

छान झालीये!

Kamini Phadnis Kembhavi said...

dhanyawad sangram :)