कविता

चंद्र 
कवितेतला
कोजागिरीही कवितेतलीच
आकाश तेही अर्थात तिथलंच
मग तिथे अवेळी येणारा पाऊस,
सगळ काही विस्कटून टाकणारी वादळं
त्यात फरफटत जाणारे आपण
शब्दही, आणि अर्थही तिथलेच
सगळ्या भावना, सगळी दु:ख
सगळा आनंद तिथलाच
असं जरी असलं आणि
आयुष्य म्हणजे एक कविताच 
असं म्हटल
तरी 
एक कविता म्हणजे सगळं आयुष्य नसतं,
नसतं ना ?

No comments: