येरेवानच्या झावान्तोर एअरपोर्टवर पोचलो व्हिसा आदी प्रक्रिया होऊन
बाहेर यायला साधारण पाऊण तास लागला. आम्ही आधीच कॅब सांगितलेली होती पण
ती आम्ही पोचलो तरी अजून आली नव्हती त्यामुळे त्याला फोन करणे त्याची वाट
बघणे आदी घोळात तिथे सीमकार्ड घ्यायच राहून गेल आणि लोकल सीम नसल्यामुळे
पुढे अनेक अडचणींचा सामना करावा लागला ते पुढे त्या त्या वेळेला येईलच.
दोन्ही मुलाना हॉटेल मध्ये राहायचं नव्हत त्यामुळे बुकिंग सगळी होमस्टेमध्ये केली होती. आता येरेवानला आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोचलो ती वास्तू अतिशय सुंदर अगदी नदीकाठाला असलेल्या छ्प्ट्याश्या टेकडीवर होती . कुकिंगरेंज पासून वाशिंग मशीन पर्यंत सगळ्या गोष्टी होत्या.पण आयत्या जेवणाची सोय नव्हती. तर जेवणासाठी लगेच बाहेर पडण आणि जेवण आत्ताच्या घटकेला गरजेच होत. ड्रायवरनी मगाशी आम्हाला सोडताना सुपमार्केट आणि रेस्टॉरेंट दाखवल होत त्यामुळे आम्ही चौघ लगेचच बाहेर निघालो. टेकडीवर अजून वर चढून आल्यावर मग त्या परिसरातला मुख्य शहरी भाग सुरु होत होता. त्यामुळे काही पाय-या चढून उतरून मग आपण मुख्य रस्त्यावर येऊ जाऊ शकणार आहोत याची मनानी नोंद घेतली.
रेस्टॉरेंटमधे एक आज्जी एकटीच तिथे सगळीच काम करत होती. तिला अजिबात इंग्लिश येत नव्हत आम्हाला अजिबात अर्मिनियन येत नव्हत. आमच्या सारखा जेवायला आलेला एक माणूस धाऊन आला. त्याच्या मार्फत आम्ही त्या आज्जीला एवढ सांगू शकलो की आम्ही बीफ किंवा पोर्क नाही खाऊ शकत आम्हाला फक्त चिकन असलेले किंवा व्हेज पदार्थ चालतील. मग खाणाखुणा करुन आम्ही काहीतरी चिकन, भात, ब्रेड आणि दोन पदार्थांची नाव ओळखीची दिसली म्हंटल अगदीच काही नाही तर या दोन पदार्थांबरोबर जेवण होईल म्हणून ऑर्डर केली ते पदार्थ म्हणजे मुताब्बल आणि हमूस. भूक खूप लागली होती त्यामुळे अर्थातच सगळे तुटून पडले होते.
जेवण करून झाल्यावर मग जरा जवळ फिरून याव म्हणून बाहेर पडलो.
रस्त्यावरून फिरताना रशियन स्थापत्यकलेचा प्रभाव इथल्या वेगवेळ्या इमारतींवर दिसत होता. मोठ्या मोठ्या दगडी बांधकाम असलेल्या अनेक इमारती आमच लक्ष वेधून घेत होत्या.
हा येरेवानमधे आमच्या होमस्टेजवळ काढलेला पहिला फोटो
थोडस पुढे आल्यावर लवर्स पार्क नावाचा बराच मोठा पार्क दिसला त्याच्या अलीकडे मेट्रो स्टेशन होत. जवळपास कुठे तरी भटकून यायच ठरलच होत त्यामुळे आमच्या स्टेशन पासून रिपब्लिक स्क़ेअर एक स्टेशन सोडून पुढच स्टेशन आहे आणि तिथे मुख्य शहर आहे अस समजल होत. मेट्रोच तिकीट काढल आणी गम्मत वाटली आपल्या व्यापार किंवा लाईफ नावाच्या बोर्डगेम मध्ये असतात तशा प्लॅस्टिकच्या गोल चकत्या किंवा नाणी तिकीट म्हणून हातात आली होती ती त्या स्वयंचलित गेटला असलेल्या कॉईनबॉक्स मधे टाकायची आणि मेट्रो स्थानकात प्रवेश करायचा. ट्रॅकपर्यंत जाण्यासाठी स्वयंचलित जिना होता याची सवय आहेच पण हा जिना चक्कर येईल एवढा खोल जात होता. परत याच स्टेशन वर येता याव म्हणून स्टेशनच्या नावाचा फोटो काढून घेतला होता.
रिपब्लिक स्क़ेअरला खरोखच माहोल मस्त होता एकदम. एकतर त्या सगळ्या भव्य ऐतिहासिक वास्तू बघायला खूप मजा येत होती . त्यात व्हॅलेंटाईन डे चा आदला दिवस होता. इथे एकदम राष्ट्रीय सण असल्यासारखा वातावरण होत. सगळीकडे लाल हृदयाकृती फुगे गुलाब आणि अनेक आकर्षक वस्तू लावून सजावट केलेली दिसत होती. सगळी गम्मत बघत आम्ही नुसते चालत सुटलो होतो.

No comments:
Post a Comment