आर्मेनिया हा देश जगातला पहिला असा देश आहे जिथे ख्रिस्ती धर्म सगळ्यात
पहिल्यांदा एखाद्या देशाचा धर्म म्हणून स्वीकारला गेला. अनेक पुरातन
ख्रिस्ती धर्मस्थळ आणि त्यांची रचना हे या देशाच अजून एक वेगळ आकर्षण.
जगभरातून अनेक लोक केवळ ही जुनी मंदिर बघायला इथे येतात त्याचा धर्माशी
फारसा संबध नसावा अस जाणवलं.
पूर्वेला टर्की, पश्चिमेला जॉर्जिया उत्तरेला इराण तर दक्षिणेला अझरबैजान असलेला हा छोटासा देश. पूर्वी USSR चा भाग होता अजूनही इथली कित्येक छोटीमोठी गावं शहरं आपल्याला रशियामध्ये असल्याच भासवतात.
येरेवानमध्ये मुख्य शहर हे रिपब्लिक स्क्वेअरच्या आसपास आहे. या रिपब्लिक स्क्वेअरची भव्य वास्तू अतिशय देखणी आणि व्यवस्थित देखभाल केली जाणारी आहे. याच्या अगदी जवळ इथल अगदी प्रसिद्ध असलेल ओपन मार्केट/फ्लीमार्केट आहे. आपल्याकडे जसा बाजार असतो तस इथे रोज भरणारा बाजार असतो पण तो फक्त इथे हस्तकलेतून निर्माण होणार्या आणि इथेच तयार होणा-यां निरनिराळ्या वस्तूचा असतो. इथे एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वस्तू विकत घेता येऊ शकतात. स्थानिक लोक इथे अजिबात खरेदी करू नका अस सुचवतात पण आपण स्वाभाविकपणे इथे खरेदी करण टाळू शकत नाही. (शेवटच्या दिवशी खरेदी केली ती नंतर ;) )
टेम्पल ऑफ गार्नी - इथे असलेल हे जे देऊळ आहे ते ख्रीस्तपुर्वकाळातील रोमन वास्तू आहे . डोंगराळ भागातल्या विस्तीर्ण पाठारावर हे देऊळ आहे. आजूबाजूला बर्फाच्या दिवसात बर्फाळ पर्वत रस्ते त्या पार्श्वभूमीवर हे देऊळ अतिशय देखण दिसत. इथे असलेली कमालीची स्वच्छता नजरेत भरल्याशिवाय राहात नाही.
ही आज्जी एवढ्या थंडी वा-यात अशा दुर्गम परिसरात स्वतः हातानी केलेल्या बाहुल्या विकत होती. हिला चेन्नई आणि मुंबई माहित होतं. ही एका गाण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात येऊन गेली होती त्यामुळे तिला भारतीय लोकांबद्दल विशेष प्रेम आहे असही तिनं आम्हाला सांगितल.
या देवळाच्या मागे दुरवर पसरलेल्या पर्वतरांगा दिसत आहेत.
या देशाच अजून एक वैशिष्ठ म्हणजे इथल्या किमान तापमानामुळे निरनिराळ्या प्रकारची वाईन, स्कॉच, व्हिस्की , कोनियाक अतिशय मुबलक प्रमाणत कुठेही अगदी सुपरमार्केटमध्येपण मिळते आणि कुठेही बसून ती पिता येते. त्याचप्रमाणे सिगारेट पिणं ही देखील इथे अतिशय आम बात आहे (हा खास एपिसोड येतो आहेच ;) . नो स्मोकिंग झोन आपले आपल्याला शोधावे लागतात.
केवळ भारत आणि आखातातच वावरल्यामुळे या दोन गोष्टींच जरा आश्चर्य वाटण स्वाभाविकच.
#Armenia #YEREWAN #TEMPLE_OF_GARNI

No comments:
Post a Comment