कारण

पटकन कोरडी पडणारी जखम
नकोशी वाटायला लागते,
जेंव्हा
भळभळणार्‍या जखमेचीच सवय करुन दीलेली असते
मग खपली धरत असली तरी,
खरवडुन काढावीशी वाटते,
आणि
त्यातुन निघणारी कळसुध्दा देउन जाते एक अघोरी आनंद...
चला बर झालं वाहती झाली जखम परत,
आता नवीन खपली धरेपर्यंत काळजी नाही काहिच,
दु:ख करायला आहे काहीतरी कारण आता.

श्यामली

No comments: