उंच माझा झोका गं

उघडच असतं दार पिंज-याचं
अन पंखही नसतात छाटलेले
येतं पाखरू बाहेर
मस्त झेप घेतं आकाशात
पींज-याभोवती फेरी मारत एक छानशी
आणि येऊन बसत परत
पींज-यातल्याच झोक्यावर,
बाजूलाच बहरलेल्या उंच गुलमोहराकडे बघत
गुणगुणतं मजेत,..
उंच माझा झोका गं........

3 comments:

Onkar Shinde said...

सुंदर

Maahesh Deshmukh said...

wa wa kya baat hai....sundar.....
read my new kavita on my blog...waiting for reaction too

श्यामली said...

ओंकार, महेशजी कवितेच्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद :)