मी विचारलं,
परत कधी भेटणार तू,
आणि तुझ्या कविता
ऐकवत सुटलास एकानंतर एक
मीही शोधत राहिले,
त्यातच मला हवी असलेली एक
तू बोलत होतास मी ऐकत होते
ठरवलं होतं,
कशी आहेस? विचारलंस की,
ऐकवेन मीही,
माझी नसलेली,
तुझीच एक कविता
तू विचारलही "कशी आहेस?"
मी नुसतीच
हुंकारले होते...
(छानच होती... कविता!!!)
13 comments:
Maazi nasleli ,
tuzich kavita...
kharach chhan ahe kalpna..
माझी नसलेली,
तुझीच एक कविता
की
माझी असलेली,
तुझीच एक कविता
vaa kyaa baat hai? khup chaan lihates ga!
विभा,कोहम,स्नेहा मन:पूर्वक धन्यवाद दोस्तस :)
कोहम, ते माझी नसलेली>> असच आहे, मला अभिप्रेत असलेला अर्थ असा की मी शोधली तुझ्या कवितांमधे मला हवि असलेली कविता आणि ती काही सापडली नाही मग तुझ्याच कवितेमधली एक मी तुला ऐकवणार होते, ज्यामधे(ही) मी नाहिये. पण कविता छानच आहे हे मनोमन पटलेलं आहे मला.
आता वाटतंय का बरोबर?
अभिप्रेत अर्थ जाणुन घेतल्या नंतर कविता आणखीनच भावली
अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद हरेकृष्णाजी
kavita aavaDali!
मन:पूर्वक धन्यवाद a Sane man
शप्पथ ... फु२ बाऊंसर जाताजाता वाचलो.
मस्त लिहीलेयस ... ईतके दिवस कसे काय पहिले नाही यातले काहीच याचे नवल वाटतय. या वीकेंडला वाचायला मस्त काही मिळाले.
मंडळ आभारी आहे. :-)
छे तू आधी कवितेचा अर्थ वाचला बहुतेक, बाउन्सर गेलेल्या कविता कळल्यानंतर मात्र मजा येते परत वाचायला (?).
आणि अभिप्रायाबद्दल धन्यावाद
ब्लॉग वाचते रहो.
bolaaycha khUp tharavlela asta manaa-ni.. paN veL aali ki.. mag gapp-ch basta..
chhaan aahe kavita.
Monsieur K,:) abhipraayabddal khup khup dhanywaad.
Post a Comment