मैफल

रंगायची नेहमीच
तशीच आजही रंगलेली मैफल,
तू समेवर येताना
तुझ्या सुरात सुर मिसळत,
तानपु-याची साथ करणारी मी
देहभान विसरुन गाण्यामधे हरवलेला तू
.
.
.
मी हळूच उतरवला तानपुरा
मैफल रंगलेली...

6 comments:

HAREKRISHNAJI said...

पण का ?

Kamini Phadnis Kembhavi said...

कारण तिथेच आहे.... कवितेतच शेवटची ओळ बघा, मिळतय का कारण?

Sneha said...

kya bat hai? waah

ओहित म्हणे said...

:-) मीरा दिवानी!

कवयत्री आहेस म्हणून तुलाच जास्त कळेल ... http://aditiborgaonkar.blogspot.com/
ही पण चांगली लिहिते.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

श्यामलीताई, मी कविता फार वाचत नाही (कळत नाहीत!). पण तुम्ही फडणीस नाव सांगून माहेरचे नाते जोडलेत. आता तुमचा ब्लॉग पाहीन. ही कविता चांगली आहे.

Kamini Phadnis Kembhavi said...

या लिंकबद्दल आणि माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद संग्राम :)

काका हट्ट नाहिच हो कविता वाचायचा. तुम्ही इथे आलात हेच खुप.