लिहीत जातो कशास आपण?

यशोधराच्या ब्लॉगवर, "मी का लिहिते?" या पोस्टला प्रतिसाद देऊन आले. आणि इतरही ब्लॉग्जवरचा हा खो-खो वाचला. वाचून विचारातही पडले, थोडीशी गंमतही वाटली खरंच, आपण का लिहितो? या प्रश्नावर प्रत्येक लिहिणा्-याचे अगदी गंभीर विचार वाचले. नकळत मन विचार करायला लागलं. खरंच का बरं लिहितो आपण? बरंच काही नवीन सापडलंही. या सगळ्या मंडळींमध्ये आपण काय लिहिणार. म्हणून मनातल्या मनातच लिहून, वाचूनही घेतलं स्वतःला. पण मेघनानी प्रतिसाद वाचला आणि लिही तू पण म्हणून खो दिलं. मग घेतलंच लिहायला. गद्य लेखन माझा प्रांत नाही. जे काही लिहिते ते अगदीच थोड्या शब्दात बोलून टाकायची फार वाईट(?) सवय आहे मला. मग का लिहितो हे लिहायला घेतल्यावर मात्र पंचाईत झाली आणि परीक्षा असल्यासारखं वाटायला लागलं. तरीही मी आपलं घोडं दामटावतीये पुढे

स्वतःला व्यक्त करण्याचा सोपा मार्ग. हे अगदी सरधोपट उत्तर आलं माझ्याही मनात. उंहू पण अगदीच एवढं कारण नसणार आपल्या लिहिण्यामागे हेही नक्की जाणवलं. बऱ्याचदा कविता लिहून झाल्यावर जाणवत, अरे हे काय? आणि का लिहिलंय आपण? मिळणाऱ्या प्रतिक्रिया? हे एक कारण आहेका? लोक वाह वा करतात, अहं सुखावला जातो म्हणून? असेलही कदाचित पण सगळ्याच लिखाणाला प्रतिसाद मिळतोच असं नाही मग तरीही लिखाण बंद करत नाहीच आपण. जे जसं सुचेल तसं लिहितंच असतो की. मग मिळणारे प्रतिसाद हे काही कारण नाही.

बऱ्याचदा लिहून झाल्यावर जाणवत, हे काय? खरंच मग असलं नकारात्मक लिहिण्याच काय हशील? पण लिहून मोकळं झाल्यासारखं वाटतं, आपल्या डोक्यावर असलेलं कसलंतरीच ओझं अलगद कोणीतरी काढून आपल्या हातात घ्यावं आणि आपल्याला एकदम मोकळं मोकळं वाटावं तसं काहीतरी. मग या लिखाणाला सकारात्मक उर्जा म्हणून बघायला काय हरकत आहे? मनातले नकारात्मक विचार कागदावर/ब्लॉगवर उरतावल्याने बरं वाटत असेल तर चांगलंच आहे की.

प्रत्येक लिखाणाची कारण वेगवेगळी असतील हे जाणवायला लागलंय आता. मागे औरंगाबाद खाद्ययात्रा लिहिली तेंव्हा, त्या त्या जागांना मनोमन भेटून आले, ते क्षण, तेवढ्यापुरते का होईना जगून घेतले होते. आठवलं. मग लिहिणं म्हणजे उलटून गेलेल्या क्षणांना पुन्हा जगणं असं म्हणता येईल? बरिच कारणं सापडली जे लिहिलंय त्याची आणि जे न लिहूनही उमटलंय त्याचीही.

या प्रश्नाने एक कविता मात्र सुचली,त्यातल्या सुरवातीच्या ओळी अश्या .

"लिहीत जातो कशास आपण?
लढवत राहतो शब्दांचे रण, "

यशोधरा, मेघना आणि इतर सगळ्याच दिग्गज ब्लॉगर्सना या खेळाबद्दल धन्यवाद.

6 comments:

Meghana Bhuskute said...

इथे कुणीही दिग्गज वगैरे नाहीय. सगळे जण जमेल तसं, गरज म्हणून पांढर्‍यावर काळं करणारे. चुकत माकत. प्रयोग करत. लिहीत राहा. लिहीत राहू या. :)

a Sane man said...

meghanashi sahmat...kavitahi aavadali.

Anonymous said...

“Waqt rehta nahin kahin tik kar, iski aadat bhi aadmi si hai”.
- Gulzar.

Everyone is unique person; every one has problems, anger, weakness, strength, questions, answers, queries, ego, victories, defeats and experiences. he/ she doesn’t want to find the truth about life or the ultimate goal about living a life. All you know that it’s a journey through all this and all you get is a stupid experience...

your blog is only reflection of those experiences.....

what do you say..???

जयश्री said...

ह्म्म...... खरंच का लिहितो आपण...? प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं असतील. तुझी उत्तरं फ़ार प्रामाणिक वाटलीत श्यामली.

माझं म्हणशील तर ते सगळे क्षण पुन्हा एकवार जगता येतात म्हणून मला लिहावंसं वाटतं :)

Kamini Phadnis Kembhavi said...

hmm kharaya mangesh, thanks for your feedback.
thanks jayu :)

यशोधरा said...

>>> सगळ्याच दिग्गज ब्लॉगर्सना

आपण तर दिग्गजांच्याही दिग्गज आहात बाईसाहेब!! :)