तुझी ओळख सांगत एकेक ओळ उमटायला लागली,
मी थांबले, हसले नुसतच....
थोडसं दुर्लक्षही केलं त्या प्रत्येक ओळीकडे.
भांबावल्या त्या ओळी जरा...
आश्चर्याने बघायला लागल्या माझ्याकडे!
एवढ्यात, पापणी लवली जराशी
अन्,
डहुळले गेले ते ओळीचे तरंग...
मनात क्षीण आनंद!
तुझी ओळख सांगत आलेल्या 'त्या' ओळी
माझ्या या कविते उमटू न दिल्याचा.
3 comments:
बहुतही खुबसुरत कविता
धन्यवाद हरेकृश्नाची :)
Post a Comment