समिक्षण वगैरे लिहायच्या भानगडीत मी कधी पडले नाही पडणारही नाही पण यातल्या काही प्रसंगांना आणि संवांदाना दाद द्यावी वाटल्यामुळे हा पोस्ट प्रपंच.
कथानक अगदीच दळलेलं असलं तरी यातले काही प्रसंग आणि पंचेस फार विचार करायला लावणारे आहेत असं वाटलं.
मुलांना सोबत घेऊन गेलो होतो त्यामुळे काही प्रसंगांचे खुलासे करावे लागले. इथे हे प्रसंग आवश्यक होते का असा विचार मनात येत असतानाच नव-यानी हे असलं सगळं असतच हॉस्टेलमध्ये म्हणून दुजोरा दिला त्यामुळे मनात आलेली एक शंकाही विरून गेली.
तिन्ही मित्रांचे असलेले एकेक प्रसंग सुरेख जमलेले आहेत. त्यातल्या त्यात खूपच भावलेले काही प्रसंग म्हणजे फरहान त्याच्या वडिलांची समजुत घालतानाचा. माधवनचा अभिनय आणि त्यावेळचे संवाद दोन्हीला चटकन दाद जाते पाणी येतं डोळ्यातुन. दुसरा आल इज वेल वाला...त्याचा आल इज वेल फंडा अगदी पटून जाणारा. शरमन जोशीच्या वडिलांना दवाखान्यात नेल्यानंतरचा. शरमनच्या आत्महत्येनंतरचे सगळेच प्रसंग.
हसवता हसवता चिमटा काढणं संवादातुन सहज साधलं गेलं आहे. स्वानंद किरकिरेची गीतं भाव खाऊन जातात.
निखळ मनोरंजनाचे तीन तास आपल्या पदरात पडलेले असतात. अजून बोनस म्हणून काही विचार करायला भाग पाडतो हा चित्रपट.
आमिर खान नेहमीप्रमाणे उच्चच...त्याचं दिसणं आणि चित्रपटात वावरणं त्याच्या लौकिकाला साजेसं.
एखाद्या हिंदी व्यवसायिक चित्रपटाकडून अजून काय अपेक्षा ठेवायच्या?
सिनेमा संपल्यावर आल इज्ज वेल किंवा झुबी डुबी झुबी डुबी पंपारा गुणगुणत तुम्ही बाहेर पडता. :)
2 comments:
हं ... खरय.
मजा आली सिनेमा बघताना!
बोमन इराणीही आवडला मला. अफलातून जीव ओततो तोही त्याच्या पात्रात. शेवटी पेन काढून देताना सही अभिनय केलाय त्यानं.
हो ब-याच दिवसानी एक हिंदी सिनेमा बघताना अंतर्मुख व्हायला झालं..आणि मजाही तेवढीच आली.
Post a Comment