प्राक्तन लाटेचं

तुझ्यातल्या आवेगाप्रमाणे
माझं ठिकाण ठरलेलं
कधी जवळचंच तर कधी
दूर कुठेतरी असलेलं
कधीतरी सापडतो मनाजोगता निवारा
पण काम झालं, आता जा परत म्हणतो तो किनारा
तू उसळायचंस आणि कुठेही नेऊन टाकायचंस
त्यानं दोन क्षण आपलं म्हणायचं आणि
पटकन झटकून कोरडं व्हायचं.......

ह्या लाटेच्या नशीबी असच का फिरायचं?
कोणाला तिने आपलं म्हणायचं?
क्षणभर सुखावणार्‍या किनार्‍याला
का ज्याच्यामुळे तिचं अस्तित्व आहे
त्या सागराला...... ?

9 comments:

Unknown said...

ultimate..

Kamini Phadnis Kembhavi said...

dhnaywad yog

Vaishali Hinge said...

realllllllllllyyyyyy u got the point ): surekh........!!!!!

Veerendra Deshpande said...

क्या बात है!

"कोणाला तिने आपलं म्हणायचं?
क्षणभर सुखावणार्‍या किनार्‍याला
का ज्याच्यामुळे तिचं अस्तित्व आहे
त्या सागराला...... ? "

अप्रतिम!

Kamini Phadnis Kembhavi said...

shappath lopaa tU? melech mee tujhi comment wachun :)


@ virendra majhyaa blog var tumacha swagat kavitaa avadakyacha avarjun sangitalyaabaddl khuuuuuuup khup dhanywaad :)

manas6 said...

मुक्त-छंद किती प्रभावी असू शकतो ह्याचे एक फार चांगले उदाहरण आहे ही कविता... जे लिहिले आहेस ते मनाच्या तळातून आलेले आहे हे जाणवते आहे...

Kamini Phadnis Kembhavi said...

khup khup dhanyawad manas

Unknown said...

shyamali jhakas,ek dam jasa manatale shabd utarle aahet.tujhya kavita ekdam manala jaaun bhidtat.
majhya blogvar aalya baddla khup shukran.
http://mehhekk.wordpress.com/

Kamini Phadnis Kembhavi said...

khuup khuup dhnaywad mehek :)