चक्रव्यूह

कदाचित दोष नसावा कवितांचा वा त्यातल्या शब्दांचाही,
कवितेची वळणं; तिथवर नजर पोचायच्या आधीच नाहिशी होतायत
आणि अर्थाचा गहिरेपणा उथळ झाल्यासारखा वाटतोय..
या शब्दांच्या भोव-यात अडकलं की असं होतं का?
का जखम कोरडी होत आली की असं होतं?
का दोनही गोष्टीत हेच होतं?
...
शब्दांची गरज म्हणून भोवरा फिरत राहतो आठवांचा
आणि हेच धरून ठेवायचं म्हणून शब्द जुळत राहतात.
चक्रव्यूहासारखं झालंय;
सगळं काही विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...

1 comment:

आशा जोगळेकर said...

शामली छान आहे तुझा लघु लेख.
मी तुला खो देतेय पाऊस साखळी कवितेचा . प्रशांत नी सुरु केलेल्या या उपक्रमाचा पू्र्वेतिहास माझ्या ब्लॉग वर जाऊन बगता येईल तुला. माजं अन महक चे कडवं दिलंय तुझं जोड अन मला कळव.

माझे उत्तर. छंद तोच भुजंग प्रयात

सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।

माझा खो चैताली,महक आणि शामली ला

महक चे उत्तर
कसे आवरू मी , या पाउस वेड्या मनाला
ओल्या मातीचा गंध मोहवतो त्याला
जीव कंठश्च होई,वाट पाहे क्षणा क्षणाला
लवकर येण्याचा निरोप दे, माझिया साजणाला.
http://mehhekk.wordpress.com/