कुर्ता

परवा कधीतरी चुकून तो कुर्ता ड्रायक्लीनला दिला गेला
सिल्क चा सुंदर गडद गुलाबी रंगाचा
आवडत्या स्टोर मधून घेतलेला
तो कुर्ता आवडायचा भयंकरच
जपायचे पण खूप त्याला
खास प्रसंगालाच वापरायचे
नंतर व्यवस्थित काढून जरास ऊन दाखवून
पुन्हा इस्त्री बिस्त्री करून जागेवर ठेवला जायचा
कसा दिला गेला की या रोजच्या कपड्यामध्ये ?
परत आला धोब्याकडून तर,
त्याच्या त्या सुंदर गडद गुलाबी रंगाची शेड बदलेली,
त्यावर ऑफव्हाईट दोर्यांनी केलेलं भरतकाम,
त्याचाही रंग बदलला आहे वाईट नाही दिसत आहे खर तर;
पण घालावा वाटत नाहीये आणि टाकावा वाटत नाहीये,
काय करायचं असत अशा वस्तुंच ?
अशा माणसांच ?
अं??

2 comments:

writetopaint said...

विषय छान आहे. कवितेच्या अध्ये - मध्ये थोडा मानवी संदर्भ आला असता तर 'काय करावं अशा माणसांच' (असा कितीही धक्कादायक असला तरी) शेवट अधिक भावला असता. लिहीत रहा, कारण व्यक्त होणं अधिक महत्वाचं.

Kamini Phadnis Kembhavi said...

मन:पूर्वक धन्यवाद, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण लिहिता लिहिता सुचलेला पंच आहे, मोह आवरता नाही आला तो पंच कवितेत घेण्याचा .