जरा मनानी हलके व्हावे
थोडे वाहून, परतून यावे
मेघ जांभळा जरी आकाशी
हसून त्याही थांब म्हणावे
चारोळी
जपमाळ
नाहीयेस कुठेही
सगळ्या नुसत्या कल्पनाच आहेत
समोर जे दिसतंय तोही भास आहे
समजावतीये मी मनाला,
पण मग प्रत्येक श्वासाबरोबर
अपोआपच ओढल्या जाणा-या या जपमाळेच काय?
हेही थांबवायला हवं......................... .
जायके का सफर-३
आता आम्हा सगळ्या औरंगाबादकरांचा लाडका म्हणजे भोलेशंकर चाटवाला. खरंतर सहजासहजी सापडेल किंवा पोचता येईल अश्या ठिकाणी अजिबात नाहीये पण याच्याकडच्या पदार्थांची चव एकदा एखाद्यानी घेतली तर सहजा सहजी दुसरीकडे भेळ,दहिपुरी इत्यादी पदार्थ खायला जाणार नाही याची फुल्ल ग्यारंटी . याच्याकडची भेळ म्हणजे आहाहा.......
भेळेसाठी केलेल्या चटण्या बघुनच तोंडाला पाणि सुटायला लागतं. हिरवी चटणी,मग गोड चटणी आणि लाल चटणी. ही भेळ एक डिशभर म्हणजे अजून काहि खायच विसरायचच, एवढी जास्त quantity असते भेळेची. तसे याच्याकडचे सगळेच पदार्थ छान असतात पण अजून एक आवर्जुन सांगण्यासारखा पदार्थ म्हणजे दही बटाटा पुरी. सहा का आठ पुऱ्या असतात एका डिशमधे पण हे ही पोटभरेल एवढं. यातल्या दह्याचं आणि गोड चटणीच झालेलं मिश्रण फारच चवदार लागतं. ही दहिपुरी खाताना तंद्रीच लागली पाहिजे एवढी भन्नाट चव असते. औरंगाबाद शहराच्या मध्यवस्तीत अप्पा हलवायाच्या दुकानासमोर आहे हे चाटभांडार.
गेली कित्येक वर्ष फक्त थाळीच देऊनही अजून तेवढ्याच जोरात चालणारं माझं अतिशय आवडतं ठिकाण म्हणजे bus-stand जवळचं भोज राजस्थानी भोजनालय. ४०ते५० रुपयात अमर्यादित थाळी. सुरवातीला जलजीरा, २सुक्या भाज्या, २ रस्सा भाज्या, डाळ, कढी, १ स्नॅक (बटाटावडा, समोसा किंवा ढोकळा) याच्याबरोबर चटणी, ठेचा, पापड, सॅलड, गरमा गरम आणि मऊ असे तुप लावलेले फुलके, बाजरीची छोटीशी रोटली (भाकरी) यावरही तुप. यातल्या सगळ्या भाज्या छान असतात पण मला खास आवडते ती इथली कढी. फारच चविष्ठ असते अगदी पुन्हा पुन्हा घेऊन सुद्धा समाधान होत नाही. आणि शेवटी भात / खिचडी तुम्ही दोन्हीही टेस्ट करु शकता. मस्त घोटून केलेली सरसरीत खिचडी आणि वर पुन्हा तूप. इथलं वैशीष्ठ म्हणजे सगळा स्टाफ राजस्थानी वेशभुषेत असतो. आणि लांब लांब मिशा
असलेला मॅनेजर (मालक?) स्वत: पुन्हा पुन्हा येउन घरच्यासारखा आग्रह करत असतो.
रेल्वेस्टेशनरोडला असणारं फुड लव्हर्स आणि जालनारोडला असलेलं मास्टर्स कुक ही हॉटेलंपण माझ्या आवडत्या होटेल्सपैकी आहेत. हल्ली फौजी ढाबा जास्त लोकप्रिय झालाय पडेगावच्या थोडंस पुढे असलेला हा ढाबा फॅमीली पार्टीसाठी एकदम मस्त इथे लंच ला जाऊन दिवसभर मस्त टाईमपास करता येतो. मुलांना खेळायला खेळणी बसवलीयेत. पण हा ढाबा किंवा आजकालचे नविन ढाबे व्हायच्या आधीचा अस्सल ढाबा म्हणजे मिटमिट्याला असणारा पाशाभाईचा ढाबा फार सुरेख चव होती याच्याकडच्या चिकन मसालाची. आता हाही कमर्शीअल झालाय
.
साधारण नोव्हेंबर डिसेंबरमधे लायन्स क्लबतर्फे आयोजीत होणा-या आनंदनगरीमधे मिळणारा पापड कधिही न विसरता येणारा आहे. अजुनही मिळतो. फक्त या पापडासाठी पुन्हा एकदा या दिवसात औरंगाबादला जायची इच्छा आहे.
सध्या माझं फ़ेवरेट असणारं हॉटेल म्हणजे वाळुजला असणारं लुधियाना ढाबा पिवर पंजाबी चव असते सगळ्या पदार्थांना, आणि हवं तसं बनवूनही देतो हा.
आणि शेवटी औरंगाबादची शान असलेलं तारा पान सेंटर कुठेही कधीही स्पेशल जेवण झालं की तारापान ची पानं घरी आलीच पाहिजेत असा दंडकच आहे बहुतेक औरंगाबादकरांचा. आणि तीथे जाऊन पान खाणं हा तर एक राजेशाही अनुभव असतो. गाडी तारापानच्या जवळपास उभी करायची कि लगेच याचा माणुस येउन order घेतो, पाचच मिनिटात सुंदर तबकामधे गुलाबाच्या पाकळ्या,चांदिचा वर्ख लावलेली रसदार पानं तुमच्या समोर हजर असतात. अगदी नवाबी थाटात
. पोटभर जेवून पान चघळताना सहजच वाटून जात, सुख सुख म्हणतात ते याहून वेगळ ते काय असेल बरं. 
तशी ही खाद्य यात्रा न संपणारी आहे कारण चवी बदलतात, हात बदलतात आणि आपण खातच असतो . बरचसं राहून गेलय ब-याच आठवणी धुरकट झाल्या आहेत बरीचशी नावं आता आठवतही नाहियेत, हो पण चव मात्र जिभेवर रेंगाळत असते अजूनही. म्हणून किमान सध्या जेवढ आठवलं तेवढतरी जपायचा एक छोटासा प्रयत्न.
तुर्तास औरंगाबाद खाद्ययात्रा ईथेच समाप्त

जायके का सफर- २
आता गुलमंडिवर फिरतोय आपण तर इथलीच सगळी ठिकाणं बघू या . :-)
इथे अगदी २५ वर्षापेक्षाही? अं ss नाही त्याहून जुनी असलेली काही hotels आहेत त्यापैकी एक म्हणजे मेवाड. हे अजूनही गर्दीने वाहतं असलेलं hotel,याचं लोकेशन पण अगदी heart of the city (आता काही संकेत बदलले असले तरी गुलमंडी ती गुलमंडी ) स्पेश्यालीटी; दही मिसळ,कदम फर्मास मला अजूनही जावं वाटत इथे पण इथे येणारा crowd बराच बदललाय आणि स्टेटस, हायजिन असे काही नवीन शब्द माहीत झालेत मला :(. गुलमंडीच्या ऐन चौकात असलेलं शामलाल कोल्डड्रिंक्स अजूनही चालू आहे . (माझ्या लहानपणच आइसक्रीमचं एवढंच एकमेव दुकान आठवतं मला).
याच रस्त्याने जरा पुढे सिटीचौकाकडे निघालं की " गायत्री चाट भांडार "भरपूर प्रसिद्ध असलेलं चाट भांडार आहे हे, याच्याकडची कचोरी,समोसा,मुंगभजे (एकदम स्पेशल),आलुवडा .हे ही बरंच जुनं आहे आणि अजून दणदणा चालतं. इथेच गुलमंडीवर असणारं पण आम्हा मुलींना वा बायकांना जाता न येणारं एक हॉटेल म्हणजे न्यू मराठा हॉटेल. लाल तर्री पातळ रस्सा आणि झणझणिताच्याही पुढचं तिखट असे अस्सल गावठी मासांहारी पदार्थ मिळणारं ठिकाण (आम्हाला पार्सलवरच समाधान मानावं लागायचं )अजूनही चालू आहे बहुदा. आता जरा गुलमंडीवरुन अंबा अप्सरा talkies कडे निघायचं आपल्याला याच्या समोर असणा-या गाड्या म्हणजे साबुदाणा वडयासाठी गर्दी खेचणा-या.
औरंगपु-यात आलं की आली आमची शाळा आणि collage. अर्थात एस बी colony. इथे असणारं पुर्णानंद या दुकानाबद्दल तर किती लिहावं तेवढं थोडं आहे. इथे आलुवडा आणि समोसा भन्नाट मिळायचा पब्लिक वेडं झालं होतं तेव्हा ;अक्षरशः: घरीसुद्धा पार्सल मागवले जायचे .आता collage मधून टिपी साठी गाठायची ठिकाणं :D
निराला बाजार मधलं ५६ भोग तेव्हाच्या तरुण पिढीसाठी 'दिल की धडकन " वगैरे होतं मस्त बनवलं होतं त्यानं. ते हॉटेल खायला विशेष काही प्रसिद्ध नव्हतं तिथलं पण माहौल एकूणच लै भारी असायचा.याच्या समोरच असणारं आर्चिज पण याचंच भावंड इथे पावभाजी छान मिळायची. हे रिनोवेट केलं वाटत आणि अजूनही चालू आहे. ५६ भोग मात्र बंद पडलं केव्हाच :( आणि
आहा पैठणगेटवरच लकी ज्यूस सेंटर भरपूर जुनं अजूनही तेवढंच चालणारं . मग गोमटेश मार्केटमधलं राधिका (उडुपी), वरद गणेश समोरच मेषा दोन्हीही स्वस्त मस्त आणि आपले वाट्णारे कधीही गेलं तरी पडीक पब्लिक सापडणारच इथे. (आता दोन्ही नाहीये). तिथून पुढे जुन्या हेडगेवार hopitalच्या बाजूला एका साऊथ इंडियन माणसाने चालू केलेला stall . हा stall एवढा चालतो खरचच त्याच्याकडचा मेदूवडा,इडली, सांबार ,आणि सही ssss असणारी चटणी. क्रांती चौकातल्या पावभाजीच्या गाड्या अजूनही आहेत, मस्त पावभाजी मिळायची. खास पावभाजीसाठी आम्ही एवढ्या लांब जायचो तेव्हाही.(नवीन जाणा-यांना क्रांती चौक आणि निराला बाजार छान option आहेत सटरफटर खाण्यासाठी).

Subscribe to:
Posts (Atom)