कविता सुचताना....वा सुचत नसताना ; सुचलेलं काहीतरी, कसही काहीही म्हणता येईल.
कवितेची पहिली ओळ लिहून झाली की आपलं माकड. मग त्या ओळीच्या, शब्दाच्या मागे मागे अगदी दूरदूर भटकत कुठल्या कुठे....कुठलातरीच प्रवास, डिलिटवर क्लिक करुन नजरेआड सरकवलेला अमर्यादित कचरा. छे! छे ! नाद सोडायला हवा या बाईचा. कायच्या काय कटकट नायतर .
ती खेळवत राहते आपल्याला. अगदी नवीन नवीन लिहायला लागल्यावर, लहान मुलाच्या हातावर अगदी खडीसाखरेचा खडा ठेवल्यावर सुद्धा त्याचे डोळे लकाकतात तशी पदरात एखादी ओळ पडली तरी वाटत; आहा!..वा! वा!, क्या ब्बात है! छे भलतच, फारच मस्त लिहिलय की आपण. चला चला पुढे...बास झालं रेंगाळणं.
इथेच फसलात तुम्ही हो अगदी मस्स्स्स्त फसलात...जराशी पाठ थोपटते आणि आपल्याला पुढे फरफटत नेते
ही कविता. मग त्या त्या कवितेच्या मूडप्रमाणे तुमच पुन्हा माकड , हम्म!
मग पुढली ओळ....अजून पुढे...अजून पुढे......अडकलात पुरते आता सुटका नाही. ही कविता तुम्हाला आयुष्य देऊन जाणार (का आयुष्यच होऊन राहणार)?
कायच्याकायच खरं तर, लिहिणा-यांच काय म्हणणय म्हणे?

3 comments:
mast lihilay.
ती खेळवत राहते आपल्याला. अगदी नवीन नवीन लिहायला लागल्यावर... :-)
अगदी :)
धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल :)
ha ha .. kharay!
Post a Comment